मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गले आहेत. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी 8 हजार डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. मानधनात वाढ आणि हॉस्टेलमध्ये चांगली सुविधा या मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं पण निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप मार्डने केलाय.