मुंबई : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, यांचे उत्तर मिळाले आहे. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ बैठकीत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतापदावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विधिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होताच, फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देखील निश्चित झाले आहे. फडणवीस उद्या (दि. ५) संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. दरम्यान राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नावावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फडणवीस यांच्या अभिनंदनाबाबत कोणती पोस्ट अद्यापही दिसून न आल्याने समाजमाध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे. तसेच राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी देवेन्द्र फडणवीस यांचे कुठल्याच प्रकारची अभिनंदनपर पोस्ट केलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अजूनही नाराजच आहेत का? या मुद्द्याला समाज माध्यमांवर हवा मिळत आहे. तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा फडणवीस यांचे अभिनंदन करणारी कुठलीच पोस्ट अद्याप केलेली नाही. यामुळे समाज माध्यमांवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होऊन तास उलटून गेला, तरी सुद्धा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले नाही.. याचा अर्थ काय घ्यायचा??#eknathshinde #devendrafadnvis
— Bharat_M.B_Dake (@BharatMBDake777) December 4, 2024
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन नाहीच..? याचा अर्थ काय?@Shivsenaofc
— Ketankumar (@Ketankumar005) December 4, 2024