Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Devendra Fadnavis At Davos: महाराष्ट्रात साकारणार ‘तिसरी मुंबई’! दावोसमध्ये ‘रायगड-पेण ग्रोथ सेंटर’ची घोषणा; 1 लाख कोटींची गुंतवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 January 2026, 12:09
Devendra Fadnavis At Davos: Maharashtra to build 'Third Mumbai'! 'Raigad-Pen Growth Center' announced in Davos; Investment of Rs 1 lakh crore

मुंबई: स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड इकॉनॉमिक (Devendra Fadnavis At Davos) फोरमच्या वार्षिक बैठकीत यंदा महाराष्ट्र केंद्रस्थानी राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने दावोस दौऱ्यातून केवळ गुंतवणूकच नव्हे, तर जागतिक दर्जाचे ज्ञान, तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन सहकार्य राज्यात आणण्याचा ठोस प्रयत्न केला आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, दावोस दौरा हा महाराष्ट्रासाठी केवळ गुंतवणूक मिळवण्याचा कार्यक्रम नसून, भविष्यातील शहरे, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था आणि औद्योगिक विकासाचा रोडमॅप ठरवण्याचा मंच आहे. याच पार्श्वभूमीवर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, सिंगापूरमधील सुबाना जुराँग, नॉर्वेची जीओ-टेक्निकल संस्था यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी धोरणात्मक सामंजस्य करार करण्यात आले.

 

या करारांमुळे महाराष्ट्रातील शहरे अधिक नियोजनबद्ध, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यास मदत होणार आहे. वाहतूक नियोजन, नागरी पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सिटी विकासासाठी जागतिक अनुभवाचा थेट लाभ राज्याला मिळणार आहे.

दावोस दौऱ्याचा आणखी एक मोठा टप्पा म्हणजे रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा. नवी मुंबई विमानतळापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणारे हे तिसऱ्या मुंबईतील पहिले नियोजित शहर ठरणार आहे. येथे ‘प्लग अँड प्ले’ संकल्पनेवर आधारित रेडी-टू-स्टार्ट उद्योग उभारले जाणार असून, बीकेसीच्या धर्तीवर एक नवे बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होणार आहे.

या शहरासाठी सुमारे 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले असून कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, दुबई, सिंगापूर आणि फिनलंडमधील दिग्गज कंपन्यांनी सहभाग दर्शवला आहे. यामुळे उच्च पगाराच्या नोकऱ्या, फिनटेक आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्सची इकोसिस्टिम उभी राहणार आहे.

दावोसमधील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ पॅव्हेलियनही गुंतवणूकदारांचे प्रमुख आकर्षण ठरले. जागतिक बँक, ह्युंदाई, एपी मोलर मर्स्क, जेबीआयसीसारख्या संस्थांशी झालेल्या चर्चांमधून हरित औद्योगिक कॉरिडॉर, ईव्ही, अर्बन मोबिलिटी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्रासाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.

दावोस दौऱ्याने महाराष्ट्राच्या जागतिक व्यासपीठावरील प्रतिमेला नवे बळ मिळाले असून, राज्याच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला गती देणारा हा टप्पा ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

विनापरवानगी वडिलोपार्जित संपत्तीची विक्री शक्य? कोणाचीही संमती न घेता थेट व्यवहार; वाचा काय सांगतो कायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.