मुंबई: शहरी नक्षलवाद प्रकरणी आणि महाराष्ट्रातील भीमा-कोरेगावमधील हिंसाचार प्रकरणी जामिनावर सुटका झालेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलाखा यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक शनिवारी नवी मुंबईत दाखल झाले आहे. नवलाखा राहत असलेल्या आग्रोळी गावात हे पथक दाखल झाले.
काही दिवसांपूर्वी नवलाखा यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता. त्यापूर्वी नवलखा यांना नवी मुंबईतील घरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांच्या नजरकैदेत असलेले गौतम नवलखाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांची विशेष सेल गौतम नवलखा यांची चौकशी करत आहे. चिनी फंडिंग आणि सैयद गुलाम नबी फई यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत.