मुंबई: नवी मुंबईतील (Crime News) सानपाडा परिसरात असलेल्या एका नामांकित (Navi Mumbai News) शाळेतून गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा (Mumbai Crime) फासणारी अत्यंत संतापजनक (Sanpada News) घटना समोर आली आहे. शाळेतील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आणि एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून सानपाडा पोलिसांनी अमीर खान नावाच्या पीटी शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

माझा मेसेज त्या मुलीला का दिला नाहीस
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सुरुवात ऑगस्ट 2025 मध्ये झाली होती. त्यावेळी आरोपी शिक्षक अमीर खान याने शाळेतील एका 13 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती. माझा मेसेज त्या मुलीला का दिला नाहीस अशा क्षुल्लक कारणावरून त्याने या विद्यार्थ्यावर हात उचलला होता. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी सकाळी शाळा सुरू असतानाच आरोपीने इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी सुद्धा त्याने पीडित मुलीला दिली होती. (Breaking Marathi News)
विद्यार्थिनीसोबत किळसवाणा प्रकार
घटनेनंतर आरोपी शिक्षक पीडित मुलीचा पाठलाग करून तिला सतत मानसिक त्रास देत होता. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर तिने धिर एकवटून घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. आपल्या मुलीसोबत झालेला हा धक्कादायक प्रकार ऐकून पालकांनी तातडीने सानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि शिक्षकाविरोधात तक्रार नोंदवली.
शिक्षकाला अटक
पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षक अमीर खान याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75, 78 आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडत असल्याने आता शाळा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संतापजनक घटनेनंतर आता शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि शिक्षकांच्या वर्तणुकीवर कडक लक्ष ठेवण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.







