मुंबई: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून देखील यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टीळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.