मुंबई : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, या भव्यदिव्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाहीत. त्यांना या सोहळ्याचे आमंत्रण आले आहे, परंतु, त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करत याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच अयोध्येला सर्व मंत्रिमंडळासह जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये जाहीर केले आहे. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
जय श्री राम..! अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.
जय श्री राम | अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री @narendramodi जी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची… pic.twitter.com/O24rt6NDO9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 20, 2024