मुंबई : सध्या राज्यात गुन्हेगारी तोंड वर काढत आहे. या गुन्हेगारीला रोखण्याचा मोठ्ठं आव्हान महाराष्ट्र पोलिसांसमोर असणार आहे. कारण अशातच राज्यात ज्या तीन घटना घडल्याचे समोर आले आहे त्यावरून हे दिसून येते कि कायद्याचा धाक कुणाला राहिला नाही. अशीच अवस्था सद्या दिसून येतेय.
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काही अज्ञातांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर नवी मुंबई येथे चड्डी बनियन गँगची दहशत पुन्हा पहायला मिळतेय. तर डोंबिवलीमध्ये हातात तलवार घेऊन काहींनी दहशत पसरवली आहे. त्यामुळे या टवाळखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू पाहत आहे.
पनवेल तालुक्यात काही दिवसांपासून एकाचवेळी अनेक घरांमध्ये चोरांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले होते. अशातच खारघर वसाहतीलगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टोळीने पेठ गावात अनेक घरात चो-या केल्या आहेत.
तसेच पायात चप्पल न घालता, अंगावर शर्ट न घालता बनियानवर चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोस फिरत आहेत. पनवेलमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढूनही पोलीसांना चड्डी बनियान टोळीला अटक करण्यात यश आलेले नाही.
डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय
डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय झालिलीओ बघायला मिळत आहे. डोंबिवलीतील आजदेपाडा परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भराडी माता इमारतीच्या आवारात काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता रहिवाशांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरट्यांच्या हातामध्ये तलवारी दिसून येत आहेत. त्यामुळे डोंबिवली आजदेपाडा आजदेगाव आणि परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगचा उन्माद..
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस सुरू आहे. मध्यरात्री कोयता गँगचा टवाळखोरांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. तापकीर चौकाजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. त्या आधारे वाकड पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे.