नवी दिल्ली: केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) सोमवारी महाराष्ट्र आणि झारखंडच्या जीएसटी करदात्यांना जीएसटीआर-३बी भरण्याची आणि ऑक्टोबरची कर भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवून २१ नोव्हेंबर केली. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, त्या दृष्टीने अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीबीआयसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती दिली आहे की, ऑक्टोबर २०२४ साठी जीएसटीआर-३बी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर आहे. राज्यांमध्ये एकाच दिवशी निवडणुका होत असल्याने या राज्यांतील करदात्यांना मतदानासाठी वेळ काढण्यात अडचण येऊ शकते. सरकारने जीएसटी अंमलबजावणी समिती (जीआयसी) च्या मान्यतेने, जीएसटीआर-३बी भरण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर २०२४ मध्ये नमूद केलेल्या राज्यांमध्ये व्यवसायाचे प्रमुख ठिकाण असलेल्य नोंदणीकृत व्यक्तीसाठी २० नोव्हेंबरवरून २१ नोव्हेंबर २०२४ करण्याचा निर्णय घेतला.