नवी मुंबई : ‘पिल्लू…दोन मिनिट त्रास होईल. मात्र, आपण दुसऱ्या जन्मात नक्की भेटू..’, असे म्हणत प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना खारघरमध्ये घडली. त्यानंतर प्रियकराने स्वत:ही ट्रेनखाली येत आत्महत्या केली. वैभव बुरुंगले आणि वैष्णवी बाबर यांचे एकमेकांवर प्रेम होते. या घटनेचा उलगडा आता झाला आहे.
लग्नाला घरच्यांच्या विरोध
घरच्यांच्या विरोधामुळे वैष्णवी वैभवला टाळाटाळ करत होती. त्यामुळेच वैभवने वैष्णवीला संपवून स्वत: आत्महत्येचा निर्णय घेतला. वैष्णवी माझी झाली नाही तर तिला कुणाचीच होवू देणार नाही, या भावनेतून वैभवने तिला मारुन टाकले. या गुन्ह्याची उकल झाली आणि संपूर्ण नवी मुंबई शहरात खळबळ उडाली आहे.
निर्जनस्थळी बोलावून खून
ही घटना 12 डिसेंबर रोजी घडली आहे. वैभवने खारघरच्या टेकडी परिसरात निर्जनस्थळी वैष्णवीला दुपारी भेटायला बोलावले. तिथे तिची हत्या केली आणि संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली उडी मारुन स्वत:ही आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हाईस नोट रेकॉर्ड केली. ज्याच्या आधारे या घटनेचा छडा लागला.
व्हाईसनोट पोलीसांच्या हाती
नवी मुंबईतील कळंबोली येथे राहणारा चोवीस वर्षीय वैभव बुरूंगले आणि एकोणवीस वर्षीय वैष्णवी बाबर यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही जवळच राहणार असल्यानं प्रेमाचं रूपांतर दोघांना लग्नात करायचं होतं. मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. वैष्णवीच्या घरच्यांनी तिला वैभवला भेटू नये, असा समज दिला होता. यामुळे वैष्णवी हिनं वैभवला टाळण्यास सुरुवात केली. हे लक्षात आल्याने वैभवने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. गळा आवळताना ‘पिल्लू दोन मिनिट त्रास होईल. मात्र आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करून भेटू’ असे म्हणत वैभवने तिचा गळा आवळला. ही व्हाईसनोट पोलीसांना वैभवच्या मोबाईलमध्ये मिळाली.
वैष्णवीची हत्या ओवेकॅम्प गावच्या मागे केल्याचे वैभवने लिहिली होते. हत्येआधी अनेक वेळा या ठिकाणी येवून त्याने रेकी केल्याचे मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट झाले. पोलीसांनी या संपूर्ण परिसरात शोध मोहिम राबवली असता वैष्णवीची डी कंम्पोज बॅाडी पोलीसांच्या हाती लागली