मुंबई : मुंबईच्या गोराई बिचवर एका महिलेचा सात तुकडे केलेला मृतदेह आढळून आला आहे. एका प्लास्टिक बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे गोणीत गुंडळाले होते. हत्या झालेल्या व्यक्तीचे वय साधरण ३० वर्ष असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून, गोराई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. गोराई पोलिसांनी मुंबईतील बाबरपाडा भागातील शेफाली गावातून मृतदेह ताब्यात घेतला. फॉरेंसिक टीमने घटनास्थळी दाखल होत जागेची तपासणी केली.
याप्रकरणी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. जवळच्या पोलीस ठाण्यातून सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती गोळा केली जात आहे की, एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तर आधी मृतदेहाची ओळख पटू शकते, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.