मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लान तयार केला आहे. या निवणुकीसाठी भाजपने महाविजय 3.0 चे नियोजन केले आहे. शिर्डीत रविवारी एकदिवशीय अधिवेशन होणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवू हे लक्ष्य रविवारी भाजपच्या राज्य अधिवेशनात निश्चित केले जाणार आहे.
शनिवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महत्वाच्या २ बैठका घेणार आहेत. एक बैठक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसह असणार आहे. तर दुसरी बैठक आमदार आणि मंत्र्यांसह असणार आहे. रविवारी अधिवेशन समारोपीय सत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करणार आहेत. रविवारी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील १५,००० प्रतिनिधी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे.
शिर्डीमध्ये होणाऱ्या अधिवेशनाला येण्या अगोदर राज्यभरातील प्रतिनिधींना प्रत्येकी २५० सदस्यांची नोंदणी करावी लागणार आहे. पक्ष्याच्या सदस्यत्व मोहिमेची संख्या १.२ कोटी असून २.५ कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १२ कोटी सदस्यांसह भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे.
पक्षाचं कार्यकरणाऱ्या कुटुंबांची जाणीव असून कार्यकर्त्यांनी घर चलो आंदोलन राबवले पाहिजे. पक्षाला हे सुनिहित करायचे आहे की पक्षाला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंदणी केली आहे.
तसंच, भाजप १० जानेवारी रोजी घर चलो मोहीम राबवणार आहे. भाजपने अगोदरच मोबाईल नंबर जारी केला आहे. मिस्ड कॉल देऊन ही डिजिटल नोंदणी करता येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच सक्रिय सदस्यांची नोदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळावे यासाठी आतापासूनच भाजपने तयारीला सुरुवात केली आहे.