मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात अली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे. या समितीमध्ये तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले कि, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे नियोजन तसेच संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने देखील झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित केल्या असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
अशी असणार भाजपाची व्यवस्थापन समिती?
- रावसाहेब पाटील दानवे – अध्यक्ष
- दिलीप कांबळे – संयोजक
- अशोक नेते, श्रीकांत भारतीय – सहसंयोजक
- सुधीर मुनगंटीवार – जाहीरनामा समिती
- चंद्रकांत पाटील – विशेष संपर्क समिती
- पंकजा मुंडे – सामाजिक संपर्क समिती
- विजया रहाटकर – महिला संपर्क समिती
- अशोक चव्हाण – कृषी क्षेत्र संपर्क समिती
- राधाकृष्ण विखे पाटील – लाभार्थी संपर्क समिती
- रक्षा खडसे – युवा संपर्क समिती
- रवींद्र चव्हाण – प्रचार यंत्रणा समिती
- प्रवीण दरेकर – सहकार क्षेत्र संपर्क समिती
- विजय उर्फ भाई गिरकर – अनुसूचित जाती संपर्क समिती
- विजयकुमार गावित – अनुसूचित जमाती संपर्क समिती
- निरंजन डावखरे – सोशल मीडिया व आयटी
- अतुल भातखळकर – माध्यम समन्वय
- गिरीश महाजन – महायुती निवडणूक अभियान समन्वयक
- मुरलीधर मोहोळ – ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्कप्रमुख
- किरीट सोमय्या – निवडणूक संपर्कप्रमुख
विशेष निमंत्रित सदस्य
- नितीन गडकरी
- चंद्रशेखर बावनकुळे
- देवेंद्र फडणवीस
- पियुष गोयल
- विनोद तावडे
- आशिष शेलार
- नारायण राणे
- हंसराज अहिर
- गणेश नाईक
पदसिद्ध सदस्य
- रणधीर सावरकर
- विक्रांत पाटील
- माधवीताई नाईक
- विजय चौधरी
- संजय केनेकर