मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मतदारसंघासोबतच उमेदवारांची सुद्धा चाचपणी करायला सुरवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. तर महायुतीला जोरदार फटका बसल्याचे दिसून आले आहे. आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मात्र जोरदार कामगिरी करायची या उद्देशाने भाजप हा पक्ष तयारीला लागला आहे. त्याबाबत भाजपकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहे.
संपूर्ण राज्यभरात भाजपची संवाद यात्रा निघणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. पंतप्रधान पदाबाबत बोलताना विरोधकांनी तारतम्य पाळलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या नेत्याबाबत आम्ही असं वागत नाही. पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं म्हणून नरेंद्र मोदी हे लहान होणार नाही. इंडिया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक आहेत. असंही बावनकुळे म्हणाले.
आमच्याकडे बहुमत आहे..
विरोधकांना फटकारण्यासोबतच ते बोलले कि, विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणालाच चिंतेची गरज नाही. ज्यांनी खेळ मांडलेला त्यांना खेळ लखलाभ असो. असं वक्तव्य करत बावनकुळे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.