मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार नवाब मलिक यांना अधिकृत उमेदवारी दिली असली, तरी भाजप त्यांचा प्रचार करणार नाही, असा पुनरुच्चार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. शेलार म्हणाले, भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे.
महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा स्पष्ट करतो की, भाजप मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका ही दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही.