मुंबईः संघटन पर्वा अंतर्गत महाराष्ट्र भाजपने दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या साध्य केल्यानंतर पक्षाने आता येत्या २२ एप्रिलपर्यंत १ लाखापर्यंत बूथ समित्या गठन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्ष नेमण्यात येणार असून, राज्यभरातील ११९६ मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या रविवार, २० एप्रिल रोजी जाहीर केल्या जातील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा. अरूण सिंह यांनी दिली.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खा. अरूण सिंह यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते.