मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता महायुतीने दिग्गज नेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. जाहीर केलेल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.
महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार राज्यात प्रचार करणार आहेत.
महायुतीचे राज्यातील स्टार प्रचारक जाहीर
नरेंद्र मोदी
अमित शाह
जे पी नड्डा
एकनाथ शिंदे
अजित पवार
देवेंद्र फडणवीस
रामदास आठवले
नारायण राणे
अनुराग ठाकूर
राजनाथ सिंह
नितीन गडकरी
योगी आदित्यनाथ
प्रमोद सावंत
भूपेंद्र पटेल
विष्णु देव साई
डॉ. मोहन यादव
भजनलाल शर्मा
ज्योतिरादित्य सिंधिया
स्मृती ईराणी
रावसाहेब दानवे
शिवराज सिंह चौहान
सम्राट चौधरी
अशोक चव्हाण
विनोद तावडे
चंद्रशेकर बावनकुळे
आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
पियुष गोयल
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
के. अन्नामलाई
मनोज तिवारी
रवी किसन
अमर साबळे
विजयकुमार गावित
अतुल सावे
धनंजय महाडिक