मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईत ‘क्लस्टर इलेक्शन सुकाणू समिती’च्या बैठकीत प्रदेश भाजपचे पदाधिकारी आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर जेपी नड्डा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. नड्डा हे मुख्यमंत्र्यांसमवेत स्नेहभोजन करणार आहेत.
दरम्यान, वर्षा निवासस्थानी जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत जागावाटप संदर्भात फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे.