मोठी बातमी : उज्ज्वल निकम यांना भाजपने दिली उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी; खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट
मुंबई : भारतीय जनता पक्षाने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाततून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमयांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापत निकम यांना उमदेवारी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने या जागेवरील उमेदवारी जाहीर केली नव्हती. या निवडणुकीत विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होते. मात्र, अनेक दिवसांपासून या जागेवर कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट दिले आहे.
विद्यमान खासदार पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेल्या विरोधामुळे भाजपने नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवले आहे. उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पहिले आहे. त्यांनी अनेक खटल्यांमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्धच्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते.