नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राज्य निवडणूक प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय धर्मेंद्र प्रधान आणि बिप्लब कुमार देव यांना हरियाणाचे निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. झारखंडची जबाबदारी शिवराज सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. येथे हिमंता बिस्वा सरमा यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरची जबाबदारी जी किशन रेड्डी यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच पंजाब आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 5 जागांवर उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. कारण, विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यामुळे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करुन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ती चूक न करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असणार आहे.
भाजपकडून राज्यातही बदल होण्याची शक्यता
भारतीय जनता पक्षाने आगामी 4 राज्यांच्या निवडणुकांसाठी प्रभारी व सहप्रभारी यांची नव्याने नियुक्ती जाहीर केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाजपमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा आढावा नवीन प्रभारी घेणार आहेत. त्यानंतर, काही बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला म्हणावे तसे यश न मिळाल्याने पक्ष संघटनेत हे मोठे बदल होण्याची होऊ शकतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 राखता आल्या आहेत. तर, महायुतीला एकूण 17 जागा मिळवण्यात यश आले.