मुंबई : काँगेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्यानंतर माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नसतानाच राजूरकर यांच्या राजीनाम्यामुळे आता काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी आमदार अमर राजूकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून हा राजीनामा दिला आहे.
‘मी आज दिनांत १२ फेब्रूवारीपासून अध्यक्ष, नांदेड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी व उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे. धन्यवाद…’ असे अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.