मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेल्य़ा प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कोणत्याही क्षणी पोलीस आरोपीला घेऊन येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात सैफवर तीन जणांकडून हल्ला करण्यात आला होता. यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरूर सैफच्या इमारतीत शिरकाव केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
असा शिरला चोरटा सैफच्या घरात..
इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. त्यामुळे इतक्या सहजासहजी इमारतीच्या आतमध्ये शिरणे सोप्पे नाही आहे. मात्र चोरट्याकडून सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा अवपर करण्यात आला आहे. अशाप्रकारे हा चोरटा सैफच्या घरात शिरला आहे.
दरम्यान आता पायऱ्यांवरून घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याचा माग काढत त्याला ताब्यात घेतलं आहे. सैफ अली खानच्या घरात तीन हल्लेखोर शिरले होते. त्यापैकी एका हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश मिल आहे. तर अद्याप दोन आरोपी फरार आहे. पोलीस या दोन आरोपींचा शोघ घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.