मुंबई, : अभिनेता सलमान खानच्या वांद्रा येथील घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आज रविवारी (ता. 14) पहाटे पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला अनेक वेळा संपवण्याची धमकी दिली होती. या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. सलमानच्या घराबाहेर पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.