मुंबई : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024
याबाबत स्वत: संभाजीराजेंनी X अकाऊंटवरून पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकींकरिता “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले असल्याची माहिती देखील छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.