मुंबई : कल्यानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणमधील शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली होती. परंतु या प्रकरणात इतर आरोपी होते. ते मागच्या काही वर्षापासून फरार होते.आता या प्रकरणात फरार असलेल्या साहाव्या आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अजूनही फरार
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, नागेश बडेराव या सहाव्या आरोपीला कल्याण गुन्हे शाखेने नाशिकमधून अटक केले आहे.उल्हासनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गणपत गायकवाड यांच्याबरोबरच इतरही चार आरोपी अगोदरच जेलमध्ये आहेत. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड व आणखी एक आरोपी अजूनही फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी 2 फेब्रुवारी 2024 रोजी उल्हासनगर पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. महेश गायकवाड यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड आणि इतर चार आरोपींना पूर्वीच अटक झाली आहे. मात्र गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचा अजून पत्ता लागलेला नाही तो फरार आहे. या प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेला नागेश बडेराव याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे.