मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला भरभरून यश मिळालं असलं तरी निवडणूक चिन्हावरून मात्र त्यांच्या उमेदवाराचा घात झाला होता. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट (तुतारी) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी ट्रम्पेटला (तुतारी) ला मिळाली होती. या विरोधात निवडणूक आयोगात पक्षाने दाद मागितल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रंपेट असाच ठेवण्याला मान्यता दिली आहे.
लोकसभेला ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी..
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला राहिला होता. परंतु तरी सुद्धा हा स्ट्राईक रेट अजूनही चांगला राहिला असता, मात्र लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट (तुतारी) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी ट्रम्पेटला (तुतारी) ला मिळाली होती. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बसला होता. या विरोधात निवडणूक आयोगात पक्षाने दाद मागितल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रंपेट असाच ठेवण्याला मान्यता दिली आहे त्यामुळें आगामी काळात विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस असा चिन्हांचा उल्लेख बघायला मिळणार आहे.
अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह..
बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं होतं. त्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.