मुंबई : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, यांचे उत्तर मिळाले आहे. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ बैठकीत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतापदावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विधिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होताच, फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देखील निश्चित झाले आहे. फडणवीस उद्या (दि. ५) संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ बैठकीत देखील देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतापदावर शिक्कामोर्तब झाला. विधिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तसेच भाजपच्या रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, सुधीर मुंनगंटीवार, संजय कुठे, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर आमदारांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत बहुमताने फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले.