बदलापूर : बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. बदलापूर मधील नामांकित शाळा आहे. या शाळेतील एका सफाई कर्मचा-याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले आहे.
बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जयेश वाणी हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला, याबद्दल सांगितले आहे.
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच…
— Adv.Jayesh Wani – अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) August 19, 2024
दरम्यान, बदलापुरातील प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक स्तरातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पालकांकडून केला जात आहे.