मुंबई : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला कोर्टात हजर केले असता, 25 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलक आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल बदलापूर येथे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले.
आरोपी अक्षय शिंदे आहे तरी कोण?
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्याने त्यांच्या पालकांनी त्यांची विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. मुलींनी एक दादा माझ्या शू च्या ठिकाणी हात लावत असल्याचं मुलीनं सांगितल्यावर पालकांना मोठा धक्का बसला. शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यानं त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आले.
आरोपी अक्षय शिंदे (वय 24) ह्याला 1 ऑगस्ट रोजी मुंबईपासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या एका सफाई कंपनीकडून शाळेने कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवले होते. 14 ऑगस्ट रोजी त्याने शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना ज्या शाळेत घडली ती बदलापूरमधील नामांकित संस्था आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचं पुढं आलं. त्यांनी याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी देखील तब्बल 12 तास त्यांना ताटकळत ठेवले. यामुळे पालकांचा संताप झाला. तसेच त्यांनी शाळा प्रशासनावर देखील गंभीर आरोप केले.