Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 सुरुवातीला पुण्यातील ‘त्या’ तिघांना दिले होते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे काम ! तपासात मोठी माहिती आली समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 October 2024, 21:20
baba siddique murder case investigation pune three people arrested

मुंबई: माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केलेल्या रुपेश मोहोळ (२२), करण साळवे (१९) आणि शिवम कोहाड (२०) यांना सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे काम देण्यात आले होते. पण, बाबा सिद्दीकी यांचे असलेले मोठे नाव आणि हत्येसाठी मागितलेल्या मोठ्या रकमेवरून झालेल्या वादानंतर त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.

वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत असून, गुन्हे शाखेने आतापर्यंत १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मोहोळ, साळवे आणि कोहाड यांना गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा फोटो रुपेश वापरत होता. तर एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांची बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी निवड करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे काम राम कानोजिया आणि नितीन सप्रे यांना देण्यात आले होते.

मोहोळ, साळवे आणि कोहाड या तिघांची राम कानोजिया आणि नितीन सप्रे यांच्या सोबत ओळख होती. त्यामुळे कानोजिया आणि सप्रे यांनी या तिघांना बाबा सिद्दीकींच्या हत्येचे काम दिले. तिघेही पुण्यातून दोन वेळा डोंबिवलीमध्ये आले होते. कळंबोली आणि अन्य ठिकाणी भेटले. कानोजिया आणि सप्रे यांच्या सोबत मोहोळ, साळवे आणि कोहाड यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घर, कार्यालयांची रेकी केली. माजी राज्यमंत्री सिद्दीकी यांचे मोठे नाव असल्याने तिघांनी अधिक रक्कम मागितली. पुढे, बाबा सिद्दीकी यांची हत्या करणे मोठी बाब असल्याने आणि पैशांवरून झालेल्या वादातून त्यांनी माघार घेतली. नंतर शिवा, कश्यप आणि गुरमेल यांना काम देण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

Friday, 23 October 2026, 10:37

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

Friday, 23 October 2026, 10:35

लग्न होणार अडीच लाख द्यावे लागतील अन् दोन दिवसांतच धक्कादायक खुलासा; लग्नाच्या नावाखाली फसवणूक

Friday, 23 October 2026, 10:25

पुण्यात डेंगीचा पहिला बळी! 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; 4-5 दिवस ताप अन् पोटदुखीनंतर अचानक श्वास..

Friday, 23 October 2026, 10:19

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

Friday, 23 October 2026, 10:13

पुणेकरांच्या खिशाला बसणार कात्री? बस अन् कारच्या भाडेवाढीचा प्रस्ताव चर्चेत; स्कूल बसची फीही वाढणार?

Friday, 23 October 2026, 9:52
Next Post

 भरधाव बुलेट दुभाजकावर आदळली; महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp