मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना लवकरच ‘फेस रीडिंग’ प्रणालीद्वारे हजेरी लावावी लागणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने याबाबत निर्णय घेतला असून, येत्या १ मेपासून या नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
३० एप्रिलनंतर फेस रीडिंगद्वारे हजेरी अनिवार्य केली जाईल. यामुळे रुग्णालयांतील डॉक्टरांच्या अनुपस्थितीच्या तक्रारींवर नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा केली जात आहे. फेस रीडिंगबाबत अडचणी येत असतील, तर त्यांनी ३० एप्रिलपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला याबाबत कळवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे..