मुंबई: हिंदुजा समुहाची वाहन उत्पादक कंपनी अशोक लेलँड कंपनीला महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळा (एमएसआरटीसी) कडून व्हायकिंग प्रवासी बसच्या २,१०४ युनिट्ससाठी एकच सर्वात मोठी पूर्णतः तयार झालेल्या बसेसचे कंत्राट मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) हे १५,००० हून अधिक बसेस असलेले देशातील सर्वात मोठ्या राज्य परिवहन महामंडळांपैकी एक आहे. या ऑर्डरमुळे अशोक लेलँडच्या बसेसचे ताफ्यात वर्चस्व राहणार आहे. या आधुनिक, पूर्णतः तयार बसेस नवीन सीएमवीआर मानकांशी पूर्णपणे सुसंगत असतील. त्यामध्ये एआयएस १५३ अनुरूप बॉडी आणि १९७ एचपी एच-सीरिज इंजिनसह सिद्धहस्त आयजेन ६ बीएस, ६ ओबीडी, २ तंत्रज्ञान, तसेच रीअर एअर सस्पेंशन हे इतर महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये असणार आहे. या बसेस अशोक लेलँडच्या विशेष बसेस बॉडी प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उत्पादित केल्या जातील आणि सुधारित वाढीव सुरक्षितता, अधिक आराम आणि एमएसआरटीसीसाठी कमी किमतीला एकूण मालकी दिली जाईल.
याप्रसंगी अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेनू अगरवाल म्हणाले की, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) सोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत. मिळालेल्या या नवीन ऑर्डरमधून देशातील सार्वजनिक वाहतुकीच्या विकासाला चालना देत अत्यंत कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादनासाठी असलेले आमचे समर्पण अधोरेखित झाले आहे. आमच्या ग्राहकांबद्दलची आमची सखोल समज आणि त्यांच्या गरजांना त्वरित प्रतिसाद देण्याची आमची क्षमता हेच आम्हाला वेगळे करत आहे.
एमएसआरटीसीकडून ही ऑर्डर मिळाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. ऑर्डर जिंकल्यामुळे आमच्या ग्राहकांचा आमच्या उत्पादनांवर असलेला विश्वास दिसून येतो. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी खास तयार केलेल्या आमच्या बस विश्वासार्हता, आमच्या उत्पादनांचा टिकाऊपणा आणि बळकटता याची पावती
(एमएसआरटीसी) सोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत. मिळालेल्या या नवीन ऑर्डरमधून देशातील सार्वजनिक वाहतुकीच्या विकासाला चालना देत अत्यंत कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत म्हणून उभे आहोत. आम्हाला एमएसआरटीसी आणि महाराष्ट्रातील लोकांना सर्वोत्तम आराम व उच्च दर्जाची सुरक्षितता सुनिश्चित करणारा एक आधुनिक वाहन ताफा सादर करताना अभिमान वाटतो. या ऑर्डरमधून आमच्या ग्राहकांचा अशोक लेलँडवर असलेला विश्वास दिसून येत आहे, असे अशोक लेलँडचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी सांगितले.