योगेश शेंडगे
मुंबई : आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दि.१५ ऑगस्ट२०२४ रोजी स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधत आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे (रा. निमगाव म्हाळूंगी ता.शिरूर जि.पुणे) यांनी त्यांच्या न्यायीक मागण्यांसाठी उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे. अनेक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, हे त्यांना पाठिंबा देत संबंधित ठिकाणी हजेरी लावत आहेत.
माझ्या गृहविभाग, महसुल विभाग, चासकमान व पाटबंधारे विभाग, एस आय डी पुणे यांच्या विरोधात न्यायीक मागण्याबाबत माहिती देत म्हणाले की मला असलेले पोलीस संरक्षण बेकायदेशीरपणे काढणाऱ्या पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीणच्या जिल्हास्तरीय समितीची सखोल चौकशी करावी, तसेच माझ्या जिवीतास धोका आसल्याने तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील इनाम वर्ग ६ ब जमीनीमध्ये बिनशेती परवानगी घेऊन तेथे गोडाऊन चे बांधकाम न करता, बेकायदेशीरपणे तुकडे करुन प्लॉटिंग केले म्हणजे शर्थ भंग झाला. ही तक्रार अजय मोरे अपर जिल्हाधिकारी पुणे(कुळकायदा शाखा) यांच्याकडे दि.५/०३/२०२४ रोजी तक्रार करुन ५ महिने झाले तरी कारवाई करत नाही. तातडीने संबंधित तक्रारीबाबत कारवाई करण्यात यावी.
चासकमान पाटबंधाऱ्याचे कोरेगाव धानोरे शाखा कालव्यावर इकाई कंपनी, शिक्रापूर ता.शिरूर जि.पुणे व युनिक्लिंगर, सणसवाडी कंपण्यांची ४० ते५० मेट्रिक टनाची अवजड वाहने सदर कॅनलच्या साइड पट्यावर उभी असतात, कंपन्याचा कच्चा व पक्कामाल ने आण करणाऱ्या वाहनांची, कर्मचारी बस बेकायदेशीरपणे साईड पटट्यावर पार्किंग करत आहे. याबाबत तक्रार करूनही श्रीकृष्ण गुंजाळ (कार्यकारी अभियंता)चासकमान पाटबंधारे खात्याचे अधिकारी, सदर कंपन्यांना पाठीशी घालत आहे.
सदर कंपन्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करून संबंधित अधिकारी यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. कोरेगाव धानोरे शाखेची पोटचारी उजवी ३(आर ३) सणसवाडी ता. शिरूर ही चारी सपाट करत त्यावर अतिक्रमण करून अरिहंत सी.एन.जी.प्रा.लि.कंपनीने बांधकाम केले असून बांधकाम तात्काळ काढण्यात यावे.
एस.आय.डी.पुणेच्या डी.सी.पी. आणि ए.सी.पी. यांची सखोल चौकशी करुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी, या न्यायीक मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत अशोक भोरडे हे उपोषण करत आहेत. शासन त्यांच्या न्यायीक मागण्यावर काय निर्णय घेणार याबाबत पुणे जिल्ह्यातील नागरीकाचे लक्ष लागले आहे.