मुंबई: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता. अखेर आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. कल्याणमधल्या घरातून आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे कुटुंबियांना भेटायला आला असताना त्याला अटक करण्यात आली आहे. कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुतळा कोसळल्यानंतर तो फरार झाला होता.
जयदीप आपटेला अटक करण्यासाठी 5 ते 7 पथकं नेमण्यात आली होती. त्यातील कल्याण मधील पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीमने रात्री जयदीप आपटेला घरातून ताब्यात घेतलं. सिंधुदुर्गचे पोलीस जयदीप आपटेच्या मागावरच होते. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी आरोपी जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला दोन आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले.