मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेनंतर आता आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं विधान चर्चेत आलं आहे. अजित पवार हे महायुतीतच राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकतं, त्यामुळे नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, अंस संजय शिरसाट म्हणाले. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली.
राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर
संजय राऊत हा वेडा माणूस फार जास्त वेडा आहे. पंधराशे रुपयांमध्ये घर चालत नाही. हे आम्हालाही मान्य आहे. मात्र आमची ते तरी देण्याची तुमची दानत आहे? तुम्ही काय दिलं? ते आधी सांगा. नाचता येईना अंगन वाकडं हा प्रश्न, बहिणीला दिलं भावाला देतोय तुम्ही काय दिलंय. सरकारच्या योजनेचा आम्हाला फायदा होतो ही सामान्यांची भूमिका आहे, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांच्या ‘लाडकी बहीण योजने’वरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत काय निकाल लागले सगळ्यांना माहित आहेत. स्वत; शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केलं हा प्रश्न त्यांनी
शरद पवार जेव्हा खांदा झटकतील..
संजय राऊत कधी लोकांना भेटत नाही. 288 पैकी 290 जागा जिंकू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही आहे. एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण उभाटाच्या जागा या विधानसभेमध्ये वाढणार नाही. विधानसभेमध्ये काँग्रेस आणि उभाटाची युती होणार नाही. काँग्रेसवाले वाटाशी बोलत सुद्धा नाही. शरद पवार जेव्हा खांदा झटकतील. तेव्हा हे सगळे पाय खाली दिसतील. शिवसेनेचा स्वाभिमान ‘सिल्वर ओक’च्या दाराशी उभा आहे. यांनी जाती-जातीत विष पेरलं आहे, असंही संजय शिरसाट म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याचा अर्थ विस्तार होईल. पण तो कधी होईल ही वेळ कुणी सांगू शकत नाही, असं शिरसाटांनी सांगितलं.