मुंबई : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अटल सेतूच्या रात्रीच्या सौंदर्याचे कौतूक केले आहे. एक्सवर त्यांनी अटल सेतूची पहिली झलक पाहून अगदीच सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. ते नेहमीच नवीन प्रकल्प घेऊन येत असतात. तसेच सोशल मीडियाच्या अनेक युजर्सचे कौशल्य पाहून त्याचे कौतुक सुद्धा करीत असतात.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आज १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटन झाले आहे. मुंबईतील शिवडी येथून सुरु होणारा आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा अटल सेतू २१.८० किमी लांबीचा आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीने हा प्रकल्प साकारला आहे.
A night-time video of the Mumbai Trans harbour link. Connectivity & Commerce will be enhanced through the Commitment of hard-working, talented engineers.
Can’t wait to drive down this ‘golden ribbon.’Ack: @rajtoday pic.twitter.com/7vZ88jzGU8
— anand mahindra (@anandmahindra) January 10, 2024
आनंद महिंद्रांनी या सेतूचे बारसे करत ‘गोल्डन रिबन’असे खास नाव ठेवलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रात्रीच्या वेळी अटल सेतूवर दिसणारा सोनेरी प्रकाश, आजूबाजूला समुद्र आणि खाडीचा परिसर आणि अंधारात उजळून दिसणारा हा सोनेरी सी लिंक पाहून आनंद महिंद्रा यांनी या सेतूला ‘गोल्डन रिबन’असे नाव ठेवले आहे.
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूची रात्रीच्या वेळेची ही झलक आहे. शहर जोडण्याची क्षमता आणि अर्थव्यवस्थेला यामुळे वाव मिळणार आहे. या ‘गोल्डन रिबन’वरून जाण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे असे म्हणत त्यांनी या अटल सेतू अगदीच अनोखं नाव ठेवलं आहे.