मुंबई : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागली आहे. अनुसूचित जाती आणि जमाती आयोगावर अध्यक्ष आणि तीन सदस्य पद नियुक्तीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार सरकारने अडसूळ यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. धर्मपाल मेश्राम यांची उपाध्यक्षपदी, तर पुणे पिंपरीचे गोरक्षक लोखंडे आणि पालघरच्या वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या संदर्भातील शासन आदेश जरी केला आहे.