मुंबई : नागपूरमध्ये राज्य सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (रविवार) होणार आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढली आहे. मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युल्यानुसार सर्वाधिक मंत्रिपदे हे भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. तर, शिवसेनेच्या वाट्याला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले उदय सामंत, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. हे चारही जण आज संध्याकाळी चार वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांना मात्र पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
तसेच अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाबाबत धक्कातंत्राचा वापर केल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांचा समावेश नसल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी फोन आलेले आमदार..
- आमदार उदय सांमत
- दादा भूसे
- गुलाबराव पाटील
- शंभूराज देसाई
- योगश कदम
- आशिष जैस्वाल
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
- प्रताप सरनाईक
मंत्रिमंडळात अजित पवारांचे कोणते शिलेदार?
- आदिती तटकरे
- बाबासाहेब पाटील
- दत्तात्रय भरणे
- हसन मुश्रीफ
- नरहरी झिरवाळ
- अनिल पाटील