Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: आरक्षण मिळेपर्यंत आम्हाला पक्षच नाही, आमदारांचा आक्रोश; मंत्रालयासमोर ‘रास्ता रोको’

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 13:40
All Party MLA protest in front of mantralaya for maratha reservation

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी मोर्चा, साखळी उपोषण, सभा या मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली असून, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालय परिसरात आक्रोश केला. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी जोरदार मागणी आमदारांनी केली. दरम्यान, बुधवारी (ता. १) या मागणीसाठी मंत्रालयाला कुलूप लावण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांनी आंदोलन केले. या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आक्रमक होऊन, त्यांनी मंत्रालयासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केले. तसेच आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवण्याचीही मागणी केली. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरक्षण मिळेपर्यंत आमचा पक्ष कोणताच नाही, अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा या वेळी आमदारांनी दिल्या. सरकार वेळकाढूपणा करत आहे, अधिवेशन का बोलावत नाही, असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मंत्रालयात आंदोलन करत असताना या आमदारांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना आझाद मैदानातील चौकीत आणण्यात आले आहे. मराठा आरक्षणासोबत मुस्लिम, धनगरांना आरक्षण हवे, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. जरांगे यांनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केले आहे. अशात आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे. शिष्टमंडळाकडून जरांगे पाटील यांची समजूत काढून सरकारला थोडा वेळ देण्यात यावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे. आमदार बच्चू कडू उपोषणस्थळी तळ ठोकून बसणार आहेत. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामधील दुवा म्हणून कडू काम पाहणार असल्याची माहिती मिळत आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21
Next Post

Loni Kalbhor: धक्कादायक! कुंजीरवाडीमधील कृषी केंद्र व्यवस्थापक तब्बल चार दिवसापासून बेपत्ता; पोलिसांचे तपासाकडे दुर्लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp