मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनी दिल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. अजित पवारांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही विनम्रपणे स्विकारतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांची त्यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु होती. पण आता अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत स्वत:चा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख देखील केला आहे.
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
श्री. अजित पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष@AjitPawarSpeaks— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 6, 2024