ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेहमीच प्रसिद्धीत असतात. कोणता विषय असेल आणि त्यावर ते कधी काय बोलतील हे सांगता येत नाही. पटलं तर ठिक, नाही पटलं तर एखाद वाक्य बोलून मोकळे होतात. मग नंतर त्यावरून चर्चा होते. अशीच एक घटना ते रविवारी ठाणे, कल्याण विभागात असताना घडली. या ठिकाणी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. त्यानंतर सर्वसामान्यांना भेट देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते.
त्यावेळी डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील त्यांची समस्या अजित पवारांकडे मांडली. तेव्हा मुख्यमंत्री एका मिनिटात हा प्रश्न सोडवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कल्याण ग्रामीण परिसरातील वरप भागात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या परिसरात जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सामन्य लोकांनी अजित पवार यांना भेटून समस्या मांडल्या. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील समस्या मांडली. त्याव अजित पवार यांनी हे एक मिनिटाचं काम आहे, असे सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांनी हा निर्णय लागू केला नसल्याचे सांगितले.अजित पवार यांनी सांगिले की, ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ आहे. मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो, असे स्पष्ट भाष्य त्यांनी केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अजित पवार यांनी स्पष्ट सुनावले, मुख्यमंत्री म्हणतात मग…#AjitPawar #EknathShinde pic.twitter.com/SEURS5wX9Z
— jitendra (@jitendrazavar) January 8, 2024