मुंबई : निश्चित केलेल्या सुरक्षा नियमांच्या पालनांची पूर्तता न केल्याप्रकरणी एअर इंडिया कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १ कोटी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी यापूर्वी एअर इंडियाला डीजीसीएने कारणे दाखवा नोटिस देखील जारी केली होती.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने सुरक्षा नियमांच्या पालनांची पूर्तता न केल्याप्रकरणी एअर इंडिया कंपनीला दंड ठोठावला आहे. १ कोटी १० लाख रुपयांचा हा दंड ठोठावण्यात आला आहे. सुरक्षा नियमांप्रकरणी यापूर्वीही डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस देखील जारी केली होती.
प्राप्त माहितीनुसार, या विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेषतः लांब पल्ल्याच्या विमान सेवेत कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांची डीजीसीएने सखोल पडताळणी केली. यामध्ये कंपनीने सुरक्षा नियमांची पूर्तता न केल्याचे डीजीसीएला आढळून आले होते. यानंतर कंपनीला कारणे दाखवा नोटिस जारी केली होती. मात्र, त्या उत्तराने समाधान न झाल्याने कंपनीवर ही दंडाची कारवाई करण्यात आली आहे.