मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आता फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. महिलांचे सक्षमीकरण, आर्थिक स्वातंत्र्य, सुदृढ आरोग्य यासाठी घरातील महिला अन्य कोणावर अवलंबून राहू नये, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांची नोंदणी सप्टेंबर महिन्यात सुरू ठेवण्यास याआधीच मंजुरी देण्यात आली आहे.