मुंबई : आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलल्याने आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनाची तारीख ही 25 डिसेंबर 2023 अशी सांगितली होती, पण हे उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षात ढकलल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
येणाऱ्या 2024 च्या निवडणुका तोंडावर आल्यात. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरुन निशाणा साधला जातोय. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. दिघा स्टेशन, उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी मागेही केली होती. रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत असल्याचं म्हणत टीका केली होती.
आदित्य ठाकरेंच ट्विट
आज ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ च्या उद्धाटनाची तारिख असेल असं मिडियात सांगितलं होतं. पण आता ते उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षावर ढकललं! 3 महिने तयार असूनही मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन नाही. 8 महिने तयार असूनही दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन नाही. कोणासाठी नेमकं थांबवलं आहे हे सगळं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. सूरत डायमंड बोर्सचं मात्र लगेच जगाला दाखवलं. वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, डायमंड बोर्ज, मेडिकल डिव्हाईस पार्क, 40 गद्दार सगळं तिथं नेलं. हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान किती दिवस सहन करायचा? 2024 मध्ये तुम्ही ठरवा, आपल्या राज्याचं भविष्य आपण ठरवायचं की शेजारच्या राज्याने आणि गद्दार म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या चेल्यांनी! असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.