Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आबा कुटुंबियांनी अजितदादांच्या विधानावर प्रतिक्रिया देऊ नये, पुढे काय करायचं ते मी बघतो…’: शरद पवारांचा रोहित पाटलांना फोन..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 November 2024, 21:34

मुंबई : आर आर पाटील यांनी कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माझी खुली चौकशी व्हावी म्हणून फाईलवर सही केली, हा केसाने गळा कापण्याचा प्रकार होता’ असे धक्कादायक विधान अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आर आर यांच्या निधनानंतर जवळपास ९ वर्षांनी केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आर आर पाटील यांच्या कुटुंबियांना देखील धक्का बसल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगितले. या सगळ्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आर आर यांच्या कुटुंबियांना संपर्क करून माफीही मागितली आहे.

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार यांना कथित सिंचन घोटाळ्याची फाईल आठवली. “आर आर यांनीच त्या फाईलवर सही केली होती. त्यांच्या राजकीय जीवनात एवढे सहकार्य करूनही त्यांनी माझा केसाने गळा कापला”, असे विधान अजित पवार यांनी केले होते. तासगावमध्ये येऊन आर आर पाटील यांच्यावर विधान केल्याने अजित पवार यांच्या मूळ हेतूविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मुलाखतीत याच अनुषंगाने प्रश्न विचारला होता. त्यावर रोहित पाटील म्हणाले, ‘अजित पवार यांच्या विधानानंतर आबा कुटुंबियांना अतिशय वाईट वाटले. जसे आम्हाला वाईट वाटले तसे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही वाईट वाटले. सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांनीही आम्हाला दूरध्वनीवरून संपर्क केला.’ अजितदादांच्या वक्तव्यासाठी मी माफी मागते. आर आर यांनी पक्षासाठी जे कष्ट घेतले ते एका वक्तव्याने वाया गेले असं आम्हांला वाटत, असे मला सुप्रियाताई सुळे म्हणाल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.

अजितदादांच्या वक्तव्यासाठी आर. आर आबांच्या कुटुंबियांची माफी मागून सुप्रियाताईंनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिल्याचेही रोहित पाटील यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांनीही दादांच्या विधानावर खेद व्यक्त केला आहे. आबा कुटुंबियांनी अजितदादांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. पुढे काय करायचं ते मी बघतो… असे शरद पवार म्हणाल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

काँग्रेस नेत्याची मोठी खेळी! समर्थक अपक्ष म्हणून उतरले निवडणुकीच्या रिंगणात; मविआमध्ये मिठाचा खडा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp