नवी मुंबई : येथील एमआयडीसी विभागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज रविवारी (दि.16) एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोनक्वारीच्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यात पोहायला गेलेले हे पाचही मित्र अल्पवयीन होते, मात्र पोहत असताना त्यांच्यात मस्ती सुरु होती, त्या मस्तीमध्ये एका मित्राने दुस-या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला. त्यामुळे पाण्यात बुडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
यावेळी तुर्भे पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चारही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशी दरम्यान दोन मित्रांनी गुन्हा कबूल केला आहे.