ठाणे : नवीन वर्षाचे आगमन आणि थर्टी फर्स्ट जल्लोष करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. ठाणे पोलिसानी घोडबंदर रोड परिसरात एका खासगी फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबत माहिती मिळताच सदर फ्लॅटवर युनिट पाचने धाड टाकत 100 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसेच लाखो रुपयांचा अवैध सामानही पोलिसांना जप्त केलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीसाठी आलेल्या तरुण अणि तरुणींना पोलिसानी ताब्यात घेतलं असून 90 युवक आणि 5 महिला यांचा समावे आहे. त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले असून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या छाप्यात पोलिसांनी गांजा, चरस आणि इतरही काही अंमली पदार्थ जप्त केले आहेत. दरम्यान, या प्रकरणात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया रात्री उशीर पर्यंत सुरु होती. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केल्याचे समजते.
रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?
रेव्ह पार्टीमध्ये नेमकं काय चालते याबाबत फारशी स्पष्टता नसली तरी, रेव्ह पार्टी म्हणजे दारू, ड्रग्ज, संगीत, नृत्य आणि सेक्स यांचे कॉकटेल. या पार्ट्या अतिशय छुप्या पद्धतीने आयोजित केल्या जातात. ज्यांना निमंत्रित केले जाते ते ‘सर्किट’ बाहेरील लोकांना पार्टीबद्दल थोडीही माहिती देत नाहीत. या रेव्ह पार्ट्या ड्रग्ज विक्रेत्यांसाठी सर्वात फायदेशीर व्यवसाय बनल्या आहेत. या पार्ट्यांसाठी मुंबई, पुणे, खंडाळा, पुष्कर आणि दिल्लीच्या आसपासचे क्षेत्र अतिशय अनुकूल मानले जाते. खास करुन या पार्ट्या रात्रीच्या सुमारास आयोजित केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत लोकांची मुले असतात, असेही बोलले जात आहे.