मुंबई : कांदिवली येथील 13 वर्षाच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती पोलीसांना मिळाली आहे. अल्पवयीन मुलावर धार्मिक संस्थेत लैंगिक अत्याचार करणा-या 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलावर दोनवेळा अत्याचार झाला आहे. दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये कोणाचा सहभाग होता, याबाबत अद्याप माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
कांदिवली येथील 13 वर्षाच्या पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम 4 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगा एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. त्या पीडित मुलाबरोबर शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय मुलाने यावर्षी 26 मे रोजी त्या पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, पीडित मुलावर 21 ऑगस्ट यादिवशीही लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. परंतु तो कोणी केला, याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या घटनेत कोणाचा सहभाग होता, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे माहिती समोर येत आहे.