मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १८ वर्षीय मुलीला काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत बोल्ड सीनचं ऑडिशन देण्यास सांगून तिघांनी हे व्हिडिओ पॉर्न साईट वर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान हा वेब सीरीजचा भाग असल्याचं समजून मुलीने बोल्ड सिन दिले. मात्र नंतर त्यांनी हे व्हिडिओ पॉर्न साईट वर अपलोड केले. हे व्हिडिओ वायरल होताचं सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे.
हिंदुस्तान टाइम्स रिपोर्ट नुसार, तरूणीला तिचे बोल्ड सिनचे व्हिडिओ वायरल झाल्याची माहिती मित्राकडून समजली. मागील काही महिन्यात आरोपींनी तरूण मुलीला अर्नाळा बीचवर बोलावून घेतलं. यावेळी दिग्दर्शकासह चारजण होते. कॅमेरामॅन, अभिनेता आणि महिला मेकअप आर्टिस्ट देखील होते. तरूणीने केलेल्या तक्रारी मध्ये तिला एका लॉजवर नेण्यात आलं. तेथे इंटिमेट सिन शूट केल्याचं तिचं म्हणणं आहे.
हा व्हिडिओ केवळ ऑडिशन असेल आणि त्याचा अन्यत्र वापर केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र काही दिवसांतच तिच्या मित्राने एका पॉर्न साईटवर हा व्हिडिओ पाहिला. तातडीने तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा त्यांच्या मोबाईल नंबर वरून तपास लावला असून यामध्ये अजूनह काही लोकांचा समावेश असल्याचं अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.