मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी शिकत असलेल्या नर्सरीच्या सुरक्षा रक्षकानेच मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. कांदिवली परिसरात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुलगी शुक्रवारी नर्सरीमध्ये गेली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरी गेल्यानंतर मुलीला त्रास व्हायला लागला. आईने तिला जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता अत्याचार केल्याच उघड झालं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्काच बसला. डॉक्टरांनी मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पालकांना दिल्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने घडलेला सर्व प्रकार प्रकार पालकांना सांगितला.